राजापूर : धनगर समाजचे स्नेहसंमेलन उत्साहात

राजापूर : राजापूर तालुका धनगर समाजसंस्थेने समाजबांधवांना एकत्र आणण्यासाठी ‘नाळ मातीशी अन् जमातीशी’ हा स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच झाला. विविध क्षेत्रांमध्ये सुयश मिळवलेल्या यशवंतांचा गौरव करण्यात आला. विकास लांबोरे यांनी करिअरच्या नव्या दिशा ठरवण्यासाठी मार्गदर्शन केले, तर सुनील देवरे यांनी संघटना बांधणीच्या अनुषंगाने कार्यकर्ता मार्गदर्शन केले.

मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला समाजनेते, धनगर समाज उत्कर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजू जांगळे, विलास गोरे, तुकाराम बावदाने, शिवसेनेच्या नेत्या अपूर्वा सामंत, राजापूर तालुका धनगर समाजसंस्थेचे अध्यक्ष तुकाराम येडगे, सचिव संजय झोरे, खजिनदार संतोष बावदाणे, उपाध्यक्ष सुरेश शिंदे, कार्याध्यक्ष हरेश कोकरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित
होते. या वेळी देवरे यांनी संघटना बांधणीबाबत मार्गदर्शन केले, तर लांबोरे यांनी करिअर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून महिलांची झिम्मा फुगडी कार्यक्रम झाला. झिम्मा फुगडीसह धनगर समाजबांधवांनी सादर केलेल्या पारंपरिक गजानृत्यावर साऱ्यांनी ठेका धरला. हळदी-कुंकू समारंभासह लकी ड्रॉही ठेवण्यात आला होता.

कार्यक्रमाला संस्थेचे सहसचिव गणपत वरक, उपखजिनदार विश्वनाथ कोकरे, प्रवक्ता रामचंद्र जांगळी, सचिन झोरे, सल्लागार अनंत शिंदे, मंगेश येडगे, सदस्य सुरेश बावदाणे यांसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 08/Feb/2025