दापोली : दापोली शिक्षणसंस्था संचालित ए. जी. हायस्कूलची म. ल. करमरकर भागशाळा उंबर्ले विद्यालयात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद करमरकर यांच्या सहकायनि दर शनिवारी विद्यार्थिनींना लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
हे प्रशिक्षण लाठी स्पोर्टस् असोसिएशन रत्नागिरीचे सचिव सुरेंद्र शिंदे व राष्ट्रीय पंच कविता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येत आहे. शहरी भागात पैसे खर्च करून मुले कराटे, लाठीकाठी अन्य साहसी खेळाचे प्रशिक्षण घेतात; मात्र ग्रामीण भागात तसे प्रशिक्षण मिळत नाही म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाठीकाठी या खेळाचा लाभ मिळावा या उद्देशाने संस्थेने भागशाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत लाठीकाठी प्रशिक्षण सुरू केले आहे. लाठी प्राचीन मर्दानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेला हा खेळ आहे.
या प्रशिक्षणातून मुलींना स्वरक्षणाबरोबरच व्यायाम साधना त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये वीरवृत्ती निर्माण करणे, विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती वाढवणे, चापल्य व कौशल्य वाढवणे याचे धडे दिले जाणार असल्याचे शिक्षिका एम. के. साठे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 08/Feb/2025














