मुंबई : Narayan Rane Meet Eknath Shinde : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. सध्या या अनुषंगाने विविध बैठका होत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर त्या दोघांची बैठक सुरु आहे. गेल्या तासाभरापासून नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. आता या बैठकीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांना तातडीने वर्षावर बोलवल्याची माहिती मिळत आहे.
या भेटीत नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा केली. तसेच महायुतीचा फॉर्म्युला कसा असणार, याबद्दलही त्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी नारायण राणेंनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारांबद्दलही चर्चा केली. कुडाळ मालवण विधानसभा मतदार भाजपला द्यावा, अशी मागणी नारायण राणेंनी एकनाथ शिंदेंकडे केली. सध्या या मतदारसंघात ठाकरे गटाचे वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत. आता या संदर्भात मुख्यमंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.