राजापूर : शासनाच्या पीएम किसान, पीकविमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने अॅप्रोस्टैंक प्रोगाम अंतर्गत शेतजमीन आधारकार्डशी संलग्न करत फार्मर युनिक आयडी काढणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फार्मर युनिक आयडी काढण्यासाठी धावाधाव सुरू आहे; मात्र, वारंवार सर्व्हर डाउन होणे, अनेकवेळा गती मंद होणे यांसारख्या तांत्रिक अडचणी संबंधित साईटला येत असल्याने ‘फार्मर युनिक आयडी’ काढायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
शेतकऱ्यांना आधारकार्डप्रमाणे त्याच्या शेतीविषयक सर्व माहिती उपलब्ध करून देणारा फार्मर युनिक आयडी देण्यात येणार आहे. या आयडीच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्याची माहिती एकत्र संकलित होणार आहे. जेणेकरून त्या माहितीच्या आधारे शासनाला कृषीविषयक धोरण वा योजना राबवणे अधिक सुलभ होणार आहे. या व्यतिरिक्त फार्मर युनिक आयडीमुळे शेतकऱ्यांना पिकानुसार किसान क्रेडिट कर्ज, पिकांबाबत सल्ला, हवामानाबाबत माहिती व सल्ला, आपत्ती सल्ला व प्रतिसाद, बाजारभावाबाबत सल्ला, कीड, इतर रोगांबाबत सल्ला, कीटकनाशक वापरण्याबाबत सल्ला, मृदा आरोग्य माहिती यांसारखी शेतीपूर माहिती उपलब्ध होणार आहे.
केंद्र सरकारच्या नव्या नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने अॅग्रीस्टैंक प्रोगाम अंतर्गत आपले शेतजमीन आधारकार्डशी संलग्न करेणे आवश्यक आहे अन्यथा, शेतकऱ्यांना पीएम किसान, किसान, पिकविमा आणि अन्य कोणात्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही.
त्यामुळे फार्मर युनिक आयडी तयार करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सोबत घेऊन शेतकरी सेवा केंद्रावर धाव घेताना दिसत आहेत. मात्र, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना यांत्रिक अडचणींना सामारे जावे लागत आहे. संबंधित साईट सुरळीतपणे कार्यान्वित होण्याच्या प्रतिक्षेमध्ये ठाण मांडून बसावे लागत आहे. काहीवेळा दिवसभरामध्ये तर वारंवार हेलपाटेही मारावे लागत आहेत. त्यातून, त्यांना नाहक मनस्तापही सहन करावा लागत असल्याने संबंधित साईटच्या वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे फार्मर युनिक आयडी’ काढायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांना आता भेडसावू लागला आहे.
साईट फार्मर आयडी काढण्याच्या शासनाच्या वेबसाईटमध्ये सर्व्हर डाउन राहणे यांसारख्या दिवसभरामध्ये वारंवार समस्या राहत आहेत. त्यामुळे फार्मर आयडी काढण्यामध्ये अडचणी येत आहेत. याचा शासनाने सकारात्मक विचार करून संबंधित साईटवरील तांत्रिक दोष दूर करून शेतकऱ्यांना साह्य करावे- किसन शिंदे, शेतकरी, राजापूर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 08/Feb/2025














