खेड : राकेश देवरुखकर यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

खेड : यावर्षी घेण्यात आलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी येथील श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे कला शिक्षक राकेश देवरुखकर यांच्या चित्राला राज्य शासनाचे पारितोषिक जाहीर झाले. त्यांचा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबई येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीच्या सभागृहात नुकताच सन्मान करण्यात आला.

यावेळी राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. संतोष क्षीरसागर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. देवरुखकर यांना हा पुरस्कार तिसऱ्यांदा प्राप्त होत आहे. यापूर्वी सन २०१७ व सन २०२२ यावर्षी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या चित्रांचे प्रदर्शन १० फेब्रुवारीपर्यंत पाहण्यासाठी खुले राहणार आहे. देवरुखकर यांचे सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराभाई बुटाला, संस्थेचे सचिव मंगेशभाई बुटाला, श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलचे चेअरमन राजेश बुटाला, कोकणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव, सहजीवन संस्थेचे सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदनक केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 08/Feb/2025

Arihant 3