आरवली : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आ. शेखर निकम यांच्या हस्ते राजवाडी येथील गरम पाण्याच्या कुंडाचे सुशोभिरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मतदार संघातील वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व असलेली स्थळे विकसित करून पर्यटन वाढिस चालना देणे, यासाठी आ. निकम यांचे नेहमीच प्रयत्न चालू असतात. राजवाडी येथील गरम पाण्याचे कुंड हे संगमेश्वर तालुक्यातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे.
या कुंडाला शासनाच्या पर्यटन योजनेंतर्गत त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. राजवाडी येथील गरम पाण्याच्या कुंडाचे सुशोभिकरणाचे काम सुरू झाल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना एक भव्य व आकर्षक अनुभव मिळेल. त्याच बरोबर या कुंडाचे सुशोभिकरण काम पूर्ण झाल्यानंतर येथील पर्यटनाला अधिक चालना मिळेल आणि यामुळे रोजगाराच्या संधीमध्ये नक्कीच वाढ होईल, असे आमदार निकम यांनी यावेळी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 08/Feb/2025














