रत्नागिरी : हिंदू-मुस्लिम भाविकांच्या एेक्याचे प्रतिक असलेल्या नेवरे येथील शेखपीरवली बाबांचा ऊरूस शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. उर्सानिमित्त बी. के. वालावलकर रूग्णालय डेरवण, शेखपीरवली बाबा ऊर्स कमिटी नेवरे व मुंबई, जमातुल मुस्लिमीन नेवरे व एकनाथ शिेंदे शिवसेना शाखा नेवरे यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीर व मोफत शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर तसेच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
तालुक्यातील नेवरे येथे शेखपीरवली बाबांचा ऊरूस दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उत्कर्ष मंडळ नेवरे बाजारपेठ येथे शिबीर होणार आहे. या शिबिरात बी. के. वालावलकर रूग्णालयाचे जनरल सर्जन, स्त्रीरोग तज्ञ, जनरल फिजिशियन, नाक-कान-घसा तज्ञ, अस्थीरोग तज्ञ उपस्थित राहून रूग्णांची तपासणी करणार आहेत. इन्फिगाे रूग्णालयाचे नेत्रतज्ञ रूग्णांची तपासणी करणार आहेत. सध्या रक्ताचा तुटवडा रूग्णालयातून भासत असल्यामुळे सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबीरही आयोजित केले आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयातील रक्तपेढीची टीम येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 10-02-2025














