शकील गवाणकर यांना माहेर समाजरत्न पुरस्कार

रत्नागिरी : येथील सामाजिक कार्यकर्ते शकील गवाणकर यांना माहेर समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुण्यात मुख्य कार्यालय असलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात ६८ शाखा असलेल्या माहेर या संस्थेच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.

माहेर संस्थेच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारत सरकारचा नारीशक्ती पुरस्कर्त्या लुसी कुरियन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

शकील गवाणकर गेली आठ वर्षे संपर्क युनिक फाउंडेशनच्या माध्यमातून अविरत सामाजिक कार्य करीत आहेत. या त्यांच्या कार्याची दखल माहेर संस्थेने घेतली आणि त्यांना पुरस्कार प्रदान केला.

Mahrashi karve ANM

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 10-02-2025