रत्नागिरी : गाव तेथे ज्येष्ठ नागरिक संघ संकल्पना राबविण्यासाठी विशेष मोहीम

रत्नागिरी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेह मेळावा येत्या २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता कुवारबाव येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात होणार आहे.

या मेळाव्यात गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ संकल्पना राबविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत चर्चा होणार आहे.

महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ म्हणजेच फेसकॉमतर्फे राज्यभरात गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ ही संकल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे. त्याअनुषंगाने कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाने रत्नागिरी जिल्ह्यात गावोगावी ज्येष्ठांना संघटित करून प्रत्येक मध्यवर्ती गावात अथवा पंचक्रोशीत ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन किमान ५० ज्येष्ठांना संघटित केल्यास त्यांना संघ स्थापनेच्या दृष्टीने त्या गावात जाऊन आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल.

यासाठी संबंधितांनी पुढाकार घेऊन कुवारबाव संघाचे अध्यक्ष मारुती अंबरे (मोबाईल क्रमांक 9421187713 अथवा 9763297369) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येत्या २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मासिक स्नेहमेळाव्याला ज्येष्ठ नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे. यावेळी फेब्रुवारी महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र शंकरराव कदम यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:04 10-02-2025