रत्नागिरी : स्वच्छ भारत मिशनच्या टप्पा २ अंतर्गत मैलावर प्रक्रिया करून नैसर्गिक गांडूळ खत बनविण्याचा राज्यातील पहिला पायलट प्रकल्प नाचणे ग्रामपंचायतीत (रत्नागिरी) कार्यान्वित झाला आहे. मात्र मैला वाहून नेण्यासाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध नसल्यामुळे सध्या ग्रामपंचायतीला नगरपालिकेच्या वाहनावर अवलंबून राहावे लागत आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर आतापर्यंत रत्नागिरी शहरासह पाच ग्रामपंचायतीमधून ८ लाख लिटर मैला गाळ आणून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. त्यामधून अडीच टन खत तयार झाले आहे.
स्वच्छ भारत मिशनमधून कचरा येथे मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी शहरासह नाचणे, शिरगाव, मिरजोळे, खेडशी, कुवारबाव या पाच ग्रामपंचायतीमधील मैला गाळ आणून त्यावर प्रक्रिया केली जाते. पाचही ग्रामपंचायतीत सुमारे १२ हजार ३५० कुटुंबे असून, लोकसंख्या ५५ हजार ४३९ आहे. तर शहरात सुमारे दहा हजार कुटुंबे आहेत. मैला गाळ व्यवस्थास्पन प्रकल्पासाठी शासनाकडून १ कोटी २७ लाख ४१ हजार ८३९ रुपये निधी मिळाला होता. डिसेंबर २०२२ पासून आतापर्यंत सुमारे ८ साथ लिटर मैल्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामधून अडीच तर खत तयार करण्यात आले आहे. त्याचा उपयोग आंबा, काजू फळबागायतींना केला जाणार आहे. हे खत १५ रुपये किलोने शेतकऱ्यांना देण्याबाबतचा निर्णय ग्रामपंचायतीने केला आहे, त्यामधून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणार आहे. प्रकल्पात मैला आणण्यासठी स्वतःचे वाहन नसल्यामुळे रत्नागिरी पालिकेच्या वाहनाचा अवलंबून राहावे लागत आहे.
शहरातील मैला गाळ प्रक्रियेसाठी नाचणे प्रकल्पात आणला जातो. तसेच पाच ग्रामपंचायतींनाही पालिकेच्या वाहनावर अवलंबून राहावे लागते. महिन्याला वाहनाच्या ३७ फेऱ्या गाळ प्रक्रियेसाठी आणला जातो. गाळ काढण्यासाठी सहा हजार रुपये घेतले जातात, त्यातील पन्नास टक्के ग्रामपंचायतीला आणि उर्वरित पन्नास टक्के वाहनधारकांना मिळतात. स्वतःचे वाहन असेल तर ग्रामपंचायतीला अधिकचे उत्पत्न्न मिळू शकते. त्यादृष्टीने जिल्हा परिषद स्वच्छता व प्रक्रिया प्रकल्पासाठी नाचणे ग्रामपंचायतीला स्वतंत्र वाहन पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन सुरू आहे. वाहनाची किंमत लक्षात येता त्यासाठी विशेष तरतूद करावी लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अशी होते प्रक्रिया
नैसर्गिक पद्धतीने मैल्यावर प्रक्रिया केली जात असून, खत बनविण्यासाठी गांडुळांचा वापर केला जातो. टँकमध्ये प्रक्रियेसाठी मेला टाकल्यानंतर सुमारे ४० दिवसांत खत तयार होते. ते काढून साठवून ठेवले जात आहे. लवकरच त्याची विक्री केली जाणार आहे. मैला प्रक्रिया केल्यानंतर त्यामधून सुमारे ४ लाख लिटर पाणी बाहेर पडते.
मैला गाळ प्रक्रिया प्रकल्पासाठी नाचणे ग्रामपंचायतीला स्वतंत्र वाहन दिले जाणार आहे. त्यासाठी तरतूद करण्यात येईल. त्यावर चर्चा सुरू आहे. काही दिवसांमध्ये त्यावर निर्णय होईल. – कीर्तीकिरण पूजार, मुख्य कार्यकारी अधिकारी
मैला गोळा करण्यासाठी आवश्यक वाहनाची किंमत ३० लाख रुपये वाहन मिळाले तर ग्रामपंचायतीला फायदा होईल. सध्या पालिकेच्या वाहनाचा उपयोग केला जातो. उघडवावर टाकला जाणारा मैला गोळा करून त्यावर प्रक्रिया केल्याने आरोग्याच प्रश्नही सुटणार आहे. – भैय्या भोंगले, सरपंच, नाचणे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:55 PM 10/Feb/2025














