रत्नागिरी : माळनाका येथील हॉटेलबाहेर उभ्या कारची काच फोडून ११ हजारांचा ऐवज लांबवला

रत्नागिरी : शहरातील माळनाका येथील एका हॉटेलच्या बाहेर पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सॅक असा एकूण ११ हजारांचा मुद्देमाल लांबवला.

चोरीची ही घटना शनिवार ८ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वा. सुमारास घडली. याबाबत डॉ. संदीप मोतीराम तावडे (३१, रा. सौंदळ देवगड, सिंधुदुर्ग) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, शनिवारी रात्री त्यांनी आपली बलेनो कार (एमएच-०७-एजी-९९५१) माळनाका येथील हॉटेल विहार डिलक्स समोरील रस्त्यावर पार्क केली होती. या घटनेत अज्ञात चोरट्याने त्या कारची मागील काच फोडून रोख रक्कम १० हजार आणि ब्ल्यू टूथ स्पिकर असा एकूण ११ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 11/Feb/2025

Tata motars punch