रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित मुलींच्या इनडोअर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. २२ व २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती येथील इनडोअर स्टेडियम येथे होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन राजापूर विधानसभा आमदार किरण सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी भाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव बिपिन बंदरकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी व इतर सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. अधिक महितीसाठी बलराम कोतवडेकर यांच्याशी संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 11/Feb/2025














