राजापूर : ओणी येथे १९ फेब्रुवारीपासून गजानन महाराज प्रकटदिन सोहळा

राजापूर : तालुक्यातील ओणी येथील श्री गजानन महाराज (शेगाव) भक्त मंडळ यांच्यावतीने श्री गजानन महाराज (शेगांव) उपासना मंदिर, ओणी येथे १९ ते २१ या कालावधीत श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त तीनही दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

गजानन महाराज (शेगाव) उपासना मंदिरातील सोहळ्याला १९ रोजी सकाळी ७.३० ते ८.३० वा. पूजेने आरंभ होईल. ८.३० ते १२.३० वा. गणेशयाग, १० ते १२ वा. राजापुरातील महिला मंडळाचे अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन, दुपारी १२.३० ते १ वा. आरती, ४ ते ५ वा. भजन महिला मंडळ (राजापूर), ५ ते ६ वा. नामस्मरण मरण होईल. गुरुवारी (ता. २०) सकाळी ७ ते ८ वा. श्रींची षोड्शोपचार पूजा, ८ पासून श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, ९ ते ११.३० वा. श्री सत्यगजानन पूजा, दुपारी १२ ते १ वा. हरिपाठ-पिलाजीबुवा लोळगे आणि मंडळी ओणी, १ ते १.३० वा. आरती, १.३० ते ३ वा. महाप्रसाद, शुक्रवार (ता. २१) सकाळी ७.३० ते ८.३० वा. श्रींची षोडशोपचार पूजा, ८.३० ते १२.३० वा. नामस्मरण, ४ ते ५ वा. लघुरूद्र होणार आहे.

हे तीनही दिवस सायंकाळी ६ ते ९ वा. या वेळेत कीर्तन, आरती व भोवत्या होतील. कीर्तन लक्ष्मीप्रसाद पटवारी, बीड, साथसंगत ऑर्गन सर्वेश पाध्ये, तबला गजानन देसाई करणार आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष संजय नवरे, कार्यवाह डॉ. शैलेश शिंदे देसाई यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 11/Feb/2025