पंढरपुरात होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत दामले विद्यालयाचे १० खेळाडू सहभागी होणार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित सोमवार दि. १o फेबुवारी रोजी झालेल्या डेरवण येथील जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेमध्ये रत्नागिरीच्या दामले विद्यालयाने विविध क्रीडा प्रकारात तब्बल १६ पदकांची कमाई करत घवघवीत यश संपादन केले. या यशामुळे विजयी स्पर्धकांना आता पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धेतील पदकांची कमाई याप्रमाणे –
आठ वर्षाखालील मुली
१) नेहाली गावखडकर – १०० मीटर धावणे- प्रथम क्रमांक, ५० मीटर धावणे – प्रथम क्रमांक व स्टॅंडिंग लांब उडी – द्वितीय क्रमांक

२) मीरा दळवी – १०० मीटर धावणे – द्वितीय क्रमांक,५० मीटर धावणे- तृतीय क्रमांक,स्टँडिंग लांब उडी – तृतीय क्रमांक

आठ वर्षाखालील मुले
समर्थ आखाडे – १०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक, ५० मीटर धावणे- प्रथम क्रमांक,स्टँडिंग लांब उडी – प्रथम क्रमांक

Tata motars tiago

दहा वर्षाखालील मुले
१०० मीटर धावणे –
१) आयान तडवी – प्रथम क्रमांक
२)अदनान शेख – द्वितीय क्रमांक

५० मीटर धावणे
१) अदनान शेख – प्रथम क्रमांक
२) श्रेयस जाधव – द्वितीय क्रमांक

गोळा फेक –
पार्थ गोरे- द्वितीय क्रमांक

दहा वर्षाखालील मुली
वल्लरी देवस्थळी -द्वितीय क्रमांक

बारा वर्षाखालील मुले
६० मीटर धावणे
रेहान बनेटी – तृतीय क्रमांक

सर्व विजयी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री . विलास शेंडगे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक श्री . भगवान मोटे सर व मुकेश पाटील सर यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहाय्य लाभले.

सातत्यपूर्ण सराव व चिकाटी यामुळे हे यश प्राप्त झाले असून राज्यस्तरावरही आमची दामले विद्यालय ही शाळा रत्नागिरी जिल्ह्याला अभिमानास्पद कामगिरी करेल, असा विश्वास या यशाबद्दल क्रीडा शिक्षक श्री . विलास शेंडगे यांनी या प्रसंगी व्यक्त केला .

वरील सर्व विद्यार्थ्यांची पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे . सर्व विजयी विद्यार्थ्यांचे, तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 12-02-2025