रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची पर्स लांबवून अज्ञाताने रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण ७५ हजारांचा मुद्देमाल लांबवला. चोरीची ही घटना बुधवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.५० वा. सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर घडली. याबाबत राघवेंद्र श्रीधर कनयाळकर (वय ७८, रा. बोरीवली, मुंबई) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, ते तुतारी एक्सप्रेसने पत्नीसह मुंबईहून सावंतवाडी असा प्रवास करत होते. प्रवासादरम्यान फिर्यादींची पत्नी मुद्देमाल असलेली पर्स आपल्या उशाखाली घेउन झोपली होती. त्यांची रेल्वे रत्नागिरी रेल्वेस्टेशवर थांबवली असता, त्यांच्या पत्नीने पर्सची खात्री केली असता त्यांना पर्स चोरीस गेल्याचे लक्षात आले. पर्समध्ये रोख १५ हजार रुपये, सोन्याचे दागिने आणि २ मोबाईल असा एकूण ७५ हजारांचा ऐवज होता. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 12/Feb/2025














