चिपळूण : कालुस्ते नदीपात्रात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

चिपळूण : तालुक्यातील कालुस्ते येथील नदीपात्रात ४० ते ४५ वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्याचे सोमवारी उघडकीस आले. या मृतदेहाविषयी कोणतीही माहिती पुढे आलेली नसून या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कालुस्ते नदीपात्रात मृतदेह स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने हा मृतदेह नदीबाहेर काढण्यात आला. यानंतर विच्छेदनासाठी मृतदेह कामथे रुग्णालयात पाठविण्यात आला. या मृतदेहाबाबत काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 12/Feb/2025

Happy journey marathi