मंडणगड : प्रतिनिधी राज्य शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत जिल्हा परिषद मराठी शाळा, कुंबळे येथे मंडणगड महसूल विभागाच्या वतीने तालुका स्तरीय विविध विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये तालुक्यातील सर्व शासकीय विभागांनी यामध्ये सहभाग नोंदवून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती, पोलिस ठाणे, तालुक्यातील बँका आदी कार्यालयांनी कार्यशाळेत यावेळी योजनासंदर्भात प्रशिक्षण दिले. उपस्थित शेतकरी, नागरिक यांची संवाद साधला. सर्वांच्या समस्या जाणून घेतल्या. समस्या निराकरणासाठी आश्वस्थ केले. शासकीय अधिकाऱ्यांच्या या शिबिरामुळे अधिकारी व नागरिक यांच्यातील संवादाने उपस्थित नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
शिबिरासाठी तहसीलदार अक्षय ढाकणे, पोलीस निरीक्षक नितीन गवारे, गटविकास अधिकारी विशाल जाधव, तालुका कृषी अधिकारी एस. बी. आहेरकर, तालुका आरोग्य अधिकारी अभिजित गवांडे याचबरोबर वीज वितरण कंपनी, एसटी महामंडळ, पोस्ट खाते व बँकांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. शिबिरामध्ये कुंबळे, दहागाव, घराडी, विन्हे, लाटवण, दाभट, मुरादपुर, तिडे, तळेघर, भोळवली, पालघर या गावांमधील ग्रामस्थ, सरपंच व सदस्य, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, बीएलओ, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:38 PM 12/Feb/2025














