रत्नागिरी : पर्यावरणाचा समतोल व सागरी जैवविविधता अबाधित राखण्यासाठी कांदळवन व समुद्रजीव संवर्धन आज काळाची गरज आहे. वनविभागाबरोबरच पोलिस, आरोग्य विभाग, कस्टम, मत्स्य विभाग, कोस्टगार्ड तसेच स्थानिक मच्छीमार व रहिवासी या सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास यश येईल, अन्यथा ही जैवविविधता नष्ट झाल्यास भविष्यात धोके निर्माण होऊ शकतात, असे मत कांदळवन विभाग विभागीय वनाधिकारी कांचन पवार व्यक्त केले.
शहरातील हॉटेल सावंत पैलेस येथे कांदळवन प्रतिष्ठान व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने समुद्रीप्राणी स्ट्रेंडिंग उपययोजना व संवर्धन या संबंधी मंगळवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या केळी कस्टमचे सहायक आयुक्त संदीप कृष्ण, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिदे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, वनाधिकारी प्रियंका लगड आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या किनारी भागात असलेल्या कांदळवनाचे महत्त्व लक्षात घेत महाराष्ट्र शासनाने २०१२ त्य कांदळवन कक्षाची निर्मिती केली. तसेच उत्तर व दक्षिण असे दोन विभाग करण्यात आले आहेत कांदळवन क्षेत्रात वाढ होत असल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे. समुद्रीजीवांच्या रक्षणासाठी देखील चांगले काम सुरू आहे. समुद्रीजीव किनाऱ्यावर आल्यानंतर काय करावे असा प्रश्न सामान्य नागरिकांबरोबर पोलिस, वनविभाग तसेच इतर शासकीय यंत्रणेसमोर उभा राहतो. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे पवार यांनी सांगितले.
‘बॉम्बे नॅचरल सोसायटी’ चे मार्गदर्शन
कार्यशाळेत सागरी सस्तन प्राण्यांची ओळख आणि सागरी सस्तन प्राणी किनारी भागात आल्यास कसे हाताळावे, याबाबत कोस्टाल कन्नूर्वेशन फाउंडेशन, मुंबई यांनी माहिती दिली तर जलचर मोबाईल अँप कसे वापरावे, समुद्रीपक्ष्यांचे व्यवस्थापन करणे याबाबत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांनी मार्गदर्शन केले. तसेच मच्छीमारांसाठी नुकसान भरपाई योजनांचीही माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 13/Feb/2025














