चिपळूण : सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने गिरणी कामगार, त्यांचे वारसदार व कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी, ईपीएस ९५ निवृत्ती वेतनधारकांचा संयुक्त मेळावा आज (ता. १५) सकाळी १० वाजता चिपळूण शहरातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात आयोजित केला आहे.
महाराष्ट्र सरकारने १५ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय जारी करून गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांचा मुंबईत घरे देऊन पुनर्वसन करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. त्याऐवजी एमएमआरडीएच्या क्षेत्रात घरे देण्यासंबंधी धोरण जाहीर केले आहे. या धोरणाप्रमाणे मुंबईपासून सुमारे १०० किलोमीटर लांब असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शेलू तसेच वांगणी येथे पडिक जमिनीवर गिरणी कामगारांची घरे देण्यासंबंधी विकासकांची नेमणूक केलेली आहे. तो घरे घेण्यासंबंधी गिरणी कामगार वारसदारांना सांगण्यात येत आहेत.
ही एकप्रकारे गिरणी कामगार वारसदारांची फसवणूक आहे. सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने गिरणी कामगार व वारसदारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत, याबाबत आंदोलने केली जात आहेत. आजही मुंबईच्या एनटीसी गिरण्यांच्या जमिनी उपलब्ध आहेत इतरही जमिनी आहेत त्या बिल्डरांना नफा कमवण्याकरिता द्यायच्या व गिरणी कामगार व वारसदारांना ग्रामीण भागात पडिक जमिनीवर घरे द्यायची तीसुद्धा भरमसाट किमतीत द्यायची, या धोरणाच्या विरोधात राज्याच्या विधिमंडळच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात मुंबईत मोठे तीव्र आंदोलन करण्याबाबतची रूपरेषा या मेळाव्यात जाहीर करण्यात येणार आहे. तसेच कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीमधील निवृत्तीधारकांची (ईपीएस ९५ पेन्शनर्स) फसवणूक केंद्र सरकारकडून केली जात आहे, त्याबाबत माहिती दिली जाणार आहे.
या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरिता सर्व श्रमिक संघटनेचे नेते कॉम्रेड विजय कुलकर्णी, कॉम्रेड बी. के. आंब्रे, कॉम्रेड संतोष मोरे उपस्थित राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 15/Feb/2025














