संगमेश्वर : फुणगूस खाडीपट्ट्यातील पहिली हापूस आंबा पेटी पुण्यात रवाना

संगमेश्वर : कोकणात खूप ठिकाणी लहान कैरी सुद्धा दिसत नाहीत. परंतु संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीपट्ट्यातील परचुरी येथील बागायतदार शरद गोणबरे, विपुल गोणबरे यांनी आपल्या बागेतील तयार हापूस आंब्यांची चार डझनांची पेटी पुणे येथे लक्ष्मीनारायण यांना रवाना केली आहे.

गोणबरे बंधू यांनी १३ फेब्रुवारी २०२५ रोजी पहिली पेटी पाठवून मुहूर्त केला आहे. आणखी नजीकच्या काही दिवसांत त्यांच्याकडील हापूस आंबा तयार होऊन मुंबई व पुणे येथे पाठवण्यास अशीच सुरूवात करणार आहेत.

हापूस आंबा झाडांची योग्य काळजी घेणे, खत घालणे, साफसफाई, त्यासाठी कष्ट करणे, शेतीपूरक हा व्यवसाय करणे, नशिबाने हवामानाने साथ देणे अशा गोष्टी यासाठी महत्त्वाच्या असतात. अशाच प्रकारे कष्ट केले तर नक्कीच आंब्याला चांगला दर येऊन शेतकरी वर्गाला लाभ होऊ शकतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 15/Feb/2025