संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेल्या संगमेश्वर बसस्थानकाचे काम दीड महिन्यात पूर्ण होणार आहे. या नूतन इमारतीसाठी ३ कोटी ५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे या कामाला तातडीने सुरवात झाली. पावसाळ्यानंतर पुन्हा कामाला वेगाने सुरवात झाल्याने बसस्थानक वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे.
संगमेश्वर बसस्थानक नूतन इमारत सद्यःस्थितीमध्ये दोन मजली होणार असून, तळमजल्यावर उपाहारगृह, आरक्षण आणि पासकक्ष, पोलिस चौकी, हिरकणी कक्ष, पहिल्या मजल्यावर पुरुष आणि महिलांसाठी विश्रांती कक्ष उभारण्यात आले आहेत.
गेली अनेक वर्षे संगमेश्वर बसस्थानक नूतन इमारतीच्या प्रतीक्षेत होते. स्वच्छतागृहांसह इमारतीची दुरवस्था झाली होती. संगमेश्वरमधील ठेकेदार संदीप रहाटे हे या इमारतीचे काम करत आहेत. त्यांचा कामाबाबतचा अनुभव पाहता वेळेत कामे पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे ही इमारत लवकर पूर्ण होईल, असा विश्वास संगमेश्वरवासीयांना वाटत आहे. सद्यःस्थितीत काम वेगाने सुरू झाले आहे. येत्या दीड महिन्यात हे काम पूर्ण होईल, असे प्रसिद्ध ठेकेदार रहाटे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 15/Feb/2025














