राजापूर : तालुक्यातील पाचल जवळेधरमार्गे तिथवली हा रस्ता अनेक वर्ष अरुंद आहे. या मार्गावर पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्यामुळे हा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे.
तत्कालीन खासदार व मधू दंडवते यांच्या कालखंडामध्ये ते जवळेथर या रस्त्याचे काम १९७७ते ७८ यादरम्यान करण्यात अलि आणि हा स्वा कहतुकीस खुला झाला. तेव्हापासून आत्तापर्यंत या रस्त्याची स्थिती आहे तशीच आहे.
मध्यंतरीच्या काळामध्ये या रस्त्याचे वारंवार नूतनीकरण करण्यात आले, मात्र रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत.
सध्या कारुळ भुईबावडा हे घाट वाहतुकीला बंद असल्यामुळे कोल्हापूर, सातारा या ठिकाणी जाणारे अनेक पर्यटक व वाहनचालक तिथवलीमार्गे पाचलवरून अणुस्कुरा घाटमार्गे घाट माध्यावर भार पडतात. हा मार्ग वाहनचालकांना जवळचा असल्याने दिवसेंदिवस या मार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे या मार्गावरून चालताना वाहन चालकांबरोबर पादचाऱ्यांना फिरणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे.
या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे समोर येणारे वाहन सहजगत्या दिसत नाही. या मार्गावरील वाहनांची वर्दळ वाढत्यामुळे अरुंद रस्त्यामुळे व वाढलेल्या झाडीमुळे हा मार्ग धोकादायक आहे. या संदर्भात संबंधित खात्याला वारंवार निवेदन देऊन या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आलेले नाही. या अपघातक्षेत्र बनलेल्या रस्त्याची रुंदी वाढवण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. जयप्रकाश तथा बाबा चव्हाण, सरपंच, हातदे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 17/Feb/2025














