१२ लाख ३८ हजार ३७२ मतदारांचे झाले डिजिटायझेशन; चिपळूण तालुक्याने मारली १०० टक्के बाजी
रत्नागिरी : Ratnagiri Voter Registration SIR मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात मतदार नोंदणीचे काम अत्यंत वेगाने सुरू असून, संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत ९३.१८ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यामध्ये बीएलओ (BLO) कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तब्बल १२ लाख ३८ हजार ३७२ मतदारांच्या नोंदणीचे डिजिटायझेशन करण्यात प्रशासनाला यश आले आहे. या मोहिमेत चिपळूण तालुक्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत १०० टक्के काम पूर्ण केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १३ लाख २९ हजार ४२ मतदारांची नोंद असून त्यातील १२ लाख ३८ हजार ३७२ मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. मात्र, प्रशासनाकडून बीएलओंनी तब्बल तीन फेऱ्या घरोघरी मारूनही जिल्ह्यात अजूनही ८१ हजार ७२१ मतदारांच्या अर्जांची माहिती प्रशासनाला पुन्हा प्राप्त झालेली नसल्याचे समोर आले आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा:
- दापोली विधानसभा मतदारसंघ: एकूण २ लाख ९० हजार ४४७ मतदारांपैकी २ लाख ७७ हजार ८०५ मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून ९५.६५ टक्के काम झाले आहे.
- गुहागर विधानसभा मतदारसंघ: २ लाख ४२ हजार ४६८ मतदारांपैकी २ लाख २९ हजार ५९१ मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असून जवळपास ९४.६९ टक्के काम झाले आहे.
- चिपळूण विधानसभा मतदारसंघ: एकूण २ लाख ७१ हजार ४३३ मतदारांपैकी सर्व २ लाख ७१ हजार ४३३ मतदारांचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. या मतदारसंघात २५ हजार ९६१ मतदार ‘अनकलेक्टबल’ (Uncollectable) म्हणून नोंदवले गेले आहेत.
- रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ: २ लाख ९१ हजार मतदारांपैकी २ लाख २७ हजार ५४७ मतदारांचे डिजिटायझेशन झाले असून ८३.१० टक्के काम पूर्ण झाले आहे (या ठिकाणी २ लाख ४२ हजार २४४ जणांचे काम पूर्ण झाले आहे).
- राजापूर विधानसभा मतदारसंघ: २ लाख ३३ हजार १७४ मतदारांपैकी ९३.१९ टक्के काम पूर्ण झाले असून या मतदारसंघात २ लाख १७ हजार २९९ मतदारांचे काम पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर डिजिटायझेशनचे काम पूर्ण झाले असले, तरी बीएलओंनी घराघरांना भेटी देऊनही माहिती न मिळालेल्या अर्जांचा पाठपुरावा करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:21 30-07-2026













