Konkan Railway Ganpati Special Trains 2026: गणेशोत्सवासाठी ‘कोकण रेल्वे’कडून २४६ विशेष गाड्या!

चिपळूण व खेडसाठी मेमू ट्रेन धावणार

चिपळूण: Konkan Railway Ganpati Special Trains 2026 संदर्भात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आगामी गणेशोत्सवासाठी अवघा एक महिना उरला असताना, कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी २४६ गणपती विशेष गाड्या सोडण्याची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये १८४ आरक्षित आणि ६२ अनारक्षित मेमू विशेष गाड्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या काळात चिपळूण आणि खेडसाठी मेमू ट्रेनही धावणार आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात नियमित मेल-एक्सप्रेस गाड्यांवरील प्रचंड गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने कोकण रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या विशेष फेऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), पुणे आणि दिवा येथून धावणार आहेत. यामध्ये CSMT हून ९८, LTT हून ७६, तर पुण्याहून १० फेऱ्या होणार आहेत. या गाड्या सावंतवाडी रोड, रत्नागिरी, मडगाव, खेड आणि चिपळूण स्थानकांदरम्यान सेवा देतील.

१ ऑगस्टपासून बुकिंगला सुरुवात: गणपती स्पेशल आरक्षित विशेष गाड्यांचे तिकीट बुकिंग १ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार आहे. प्रवासी आयआरसीटीसी (IRCTC) संकेतस्थळावरून तसेच सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवरून तिकिटे बुक करू शकतात. प्रवाशांची मागणी वाढल्यास आणखी विशेष गाड्या सोडण्याचा विचार मध्य रेल्वे करत असल्याची माहितीही समोर आली आहे.

कोणत्या मार्गावर किती गाड्या धावणार? (तक्ता)

मार्ग (Route)फेऱ्यांची संख्या (Total Trips)
सीएसएमटी – सावंतवाडी रोड६६ फेऱ्या
सीएसएमटी – रत्नागिरी३२ फेऱ्या
एलटीटी – सावंतवाडी रोड४६ फेऱ्या
एलटीटी – रत्नागिरी२२ फेऱ्या
एलटीटी – मडगाव८ फेऱ्या
पुणे – रत्नागिरी१० फेऱ्या
दिवा – खेड (मेमू)३२ फेऱ्या
दिवा – चिपळूण (मेमू)३० फेऱ्या

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:17 30-07-2026