पावस परिसरात अरुंद रस्ता व नामफलकांच्या अभावामुळे पर्यटकांचा हिरमोड

पावस : पावस परिसरातील भागाला भेट देणाऱ्या पर्यटकांना अरुंद रस्ता व नामफलकांचा अभावामुळे अनेकांना वारंवार रस्ता विचारण्याची वेळ येते. त्यामुळे या पंचक्रोशीतील अरुंद रस्त्याबाबत संबंधित लोकप्रतिनिधींच्या पाठीशी लागून रुंदीकरणाबाबत प्रस्ताव ठेवावा. रस्ते चांगले आणि रुंद झाल्यास पर्यटकांची संख्या वाढेल आणि पर्यटकांचा संभ्रमही दूर होईल.

पर्यटन क्षेत्र बनलेल्या पावस येथील समाधी मंदिरामध्ये पर्यटक येत असतात, मंदिर परिसरातील अंतर्गत भागामध्ये स्वच्छता टापटीप व पवित्र वातावरण असते. मात्र या क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांना रस्त्याची चांगली सुविधा नसल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. पायस बस स्थानक ये समाधी मंदिर हा रस्ता औद असल्यामुळे वाहनांचालकाना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्ता रुंदीकरणाबाबत गेली अनेक वर्षे मागणी केली जात आहे.

या मंदिरामध्ये आमदार, खासदार, पोलिस अधीक्षक, शासकीय अधिकारी या मार्गावरून मार्गक्रमण करत असतात, परंतु यांच्याकडे या रस्ता रुंदीकरणासंदर्भात कोणताही प्रस्ताव मांडला जात नाही.

समाधी मंदिराकडे येताना पावस चौकामध्ये तीर्थक्षेत्राकडे जाणारे फलक नसल्यामुळे पर्यटकांची फारच अडचण निर्माण होते. अनेक पर्यटक या अस्य रस्त्यामुळे जाता येत नसल्यामुळे परस्पर निघून जातात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शक फलक लावल्यास पर्यटकांची अडचण दूर होऊ शकते, अरुंद रस्त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जातात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. मंदिर परिसरामध्ये ज्या पद्धतीने स्वच्छता आहे रथा तुलनेत येणाऱ्या रस्त्यावर कुठेही स्वच्छता दिसून येत नाही अशी स्थिती आहे.

गणेशगुळे येथील गणेश मंदिर व समुद्रकिनारा सागरी महामार्गापासून आडवा आहे. येथे अनेक पर्यटकांची येण्याची मानसिकता असते, परंतु या तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यावर मार्गदर्शक फलक दिसत नाहीत, त्यामुळे पर्यटकांना नेमके कुठे जायचे हेच समजत नाहीत. तसेच या ठिकाणी जाणारा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे पर्यटक येथे जात नाहीत.

अरुंद रस्ता व मार्गदर्शन फलकांचा अभावामुळे पर्यटन निघून जातात त्यामुळे भविष्यात पर्यटनवाढीच्या दृष्टीने दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण करणे काळाची गरज ठरणार आहे.

यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठीशी लागू रस्ता रुंदीकरण्याबाबत पाठपुरावा करणे गरजेचे आहे. त्याच गावचा सर्वांगीण विकास होऊ शकतो आणि पर्यटनाला चालना मिळू शकते.

पूर्णगड किल्ल्याचे चांगल्या प्रकारे संवर्धन करण्यात आले आहे. पुरातत्त्व विभागाने दोन वर्षांपूर्वी पाच कोटी रुपये खर्च करून किल्ला सुसज्ज करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. या किल्ल्याकडे जाणारा खाडीमार्गे काही किमीपर्यंत डांबरीकरण करण्यात आला आहे, परंतु त्या ठिकाणावरून किल्ल्याकडे जाणारा रस्ता अतिशय खराब आहे. अरुंद आहे. त्यामुळे नवीन येणाऱ्या पर्यटकांना कसरत करत व जागोजागी विचारत किल्ल्याचे ठिकाण गाठावे लागते त्यामुळे पूर्णगड खाडी [उलापासुने मार्द्रक्ष फलक लावल्यास पर्यटकांना सोयीचे होईल.

मार्गदर्शक फलक व अरुंद रस्ते यामुळे या तीर्थक्षेत्राकडे व वारंवार विचारण्याची वेळ येते. याबाबत स्थानिक आमदार व खासदार यांच्याकडे प्रस्ताव देणे गरजेचे आहे. हरिश्चंद्र साळे, पर्यटक, मुंबई

आम्ही शालेय विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन येतो, त्यावेळी किल्ला पाहण्याची इच्छा निर्माण होते. पूर्णगड किल्ल्याची पुरातत्व विभागाने चांगली दुरुस्ती केली आहे. परंतु किल्ल्याकडे जाणारा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. – राजेंद्र चौगुले, प्राथमिक शिक्षक, कोल्हापूर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 18/Feb/2025