Ratnagiri : रत्नागिरी विभागाच्यावतीने एसटीतर्फे प्रवासी राजा, कामगार पालक दिन

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाच्यावतीने प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा होणार आहे. याकरिता विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे हे जिल्ह्यातील सर्व आगारांना भेट देणार आहेत. प्रवाशांच्या व राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी सूचना ऐकून त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणार आहेत. त्यात जास्तीत जास्त प्रवासी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

यावर्षी जुलैपासून प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवार व शुक्रवार प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक आगारात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. या वेळेत प्रवासी संघटना, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात मांडू शकतात.

प्रवासी राजा दिन झाल्यानंतर दुपारी ३ ते ५ या वेळेत कामगार पालक दिन साजरा करण्यात येईल. या वेळेत संघटना व रा. प. कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक बाबतीतील प्रश्न (रजा मंजुरी, कर्तव्यासंबंधी, वेळापत्रकासंबंधी व प्रमादिय कारवाई) तक्रारी लेखी स्वरूपात मांडू शकतात. तक्रारीचे जलदगतीने निराकरण करण्यात येईल. त्या त्या ठिकाणच्या प्रवासी बंधू-भगिनींनी व राज्य परिवहन कर्मचाऱ्यानी सहभाग घ्यावा आणि समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले आहे.

प्रवासी, कामगारांच्या अडचणी होणार दूर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाच्यावतीने प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा होणार आहे. याकरीता विभाग नियंत्रण सर्व आगारांना भेटी देणार आहेत. दरम्यान, ते प्रवाशांच्या आणि कामगारांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणार आहेत.

Ratnagiri Khabardar add image

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 03/Oct/2024