मालगुंड येथे श्री राजे ग्रुपतर्फे आज शिवजयंती उत्सव

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड जोशीवाडी येथील श्री राजे ग्रुपच्यावतीने बुधवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता मालगुंड जोशीवाडी या ठिकाणी असलेल्या शिवस्मारकातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व शिवपूजा, सकाळी दहा ते बारा या वेळेत फनी गेम्स स्पर्धा, दुपारी तीन वाजता महिला भगिनींसाठी हळदीकुंकू समारंभ, दुपारी साडेचार वाजता ग्रामपंचायत मालगुंड ते मालगुंड जोशीवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत शोभायात्रा, सायंकाळी सात वाजता विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ, सायंकाळी साडेसात ते नऊ या वेळेत शिवजयंती उत्सवानिमित्त शिवचरित्रावर आधारित विशेष व्याख्यान आणि रात्री दहा वाजता करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये विविधाअंगी रेकॉर्ड डान्स असे कार्यक्रम होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 19/Feb/2025

Mahrashi karve ANM