गुहागर : जिल्हा परिषद रत्नागिरीमार्फत सिंधू रत्न योजनेअंतर्गत हाऊस बोट प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आज, २० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता होणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
गुहागर, रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांच्या सीमावर्ती राई भातगाव खाडीत या हाऊस बोटीमधून पर्यटकांना जलसफरीचा आनंद लुटता येणार आहे. या उपक्रमामुळे स्थानिक जल पर्यटनाला मोठी चालना मिळेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 20/Feb/2025
