राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन ३ ते २६ मार्च या कालावधीत होणार असून, राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडण्यात येणार आहे.

अधिवेशनाचे कामकाज ठरवण्यासाठी रविवारी विधान भवनात विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, शंभूराज देसाई, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, अनिल परब, हेमंत पाटील, श्रीकांत भारतीय, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, नितीन राऊत, रणधीर सावरकर, अमिन पटेल उपस्थित होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोन्हे या दूरस्थ प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाल्या होत्या, शनिवार, ८ मार्च रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी त्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 24/Feb/2025