देवरुख : युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियन्समार्फत संपूर्ण देशभर दि. 24 व 25 रोजी बँक संप पुकारण्यात आला आहे. यात देवरुख शाखेतील बँक कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत.
या कालावधीत दरम्यान 3 मार्चला संसदेपुढे धरणे तसेच वेगवेगळ्या दिवशी जिल्हा व शाखावाईज निदर्शने, ब्लॅक बॅच लावणे, द्विटर कॅम्पेन, रॅली, अशा विविध प्रकारची आंदोलने करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
संघटनांच्या मागण्यांमध्ये सर्व श्रेणींमध्ये पुरेशी भरती करा, सर्व तात्पुरत्या कर्मचार्यांचे नियमितीकरण करा, बँकिंग क्षेत्रात 5 दिवसांचा कार्य सप्ताह लागू करा, नोकरीची सुरक्षा सुनिश्चित करा, डीएफएसच्या परफॉर्मन्स रिव्ह्यूविषयीच्या निर्देशांना मागे घ्या, डीएफएसच्या पीएलआय निर्देशांना मागे घ्या, बँक कर्मचार्यांचे रक्षण करा, सुरक्षितता द्या, हल्ले व गैरवर्तन थांबवा. बँक अधिकार्यांसाठी आणि कर्मचार्यांसाठी सुरक्षित कार्यस्थळे निर्माण कर, पीएसबीमध्ये कामगार/अधिकारी संचालकांच्या रिक्त जागा भरा, आयबीएकडे प्रलंबित असलेल्या उर्वरित प्रश्नांचे निराकरण करा, ग्रॅच्युइटी मर्यादा 25 लाखांपर्यंत वाढवा आणि ती सरकारी कर्मचार्यांच्या समकक्ष करमुक्त करा, कर्मचारी कल्याणावर अन्यायकारक कर थांबवा. सवलतीच्या लाभांवर प्राप्तीकर कपात रद्द करा – व्यवस्थापनाने खर्च उचलावा, राष्ट्रीय हित जपण्यासाठी आयडीबीआय बँकेत 51 टक्के सरकारी हिस्सा कायम ठेवावीत, अशा मागण्यांचा समावेश आहे.
दरम्यान, शुक्रवार, दि. 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस रत्नागिरी येथे युएफबीयूतर्फे निषेध व्यक्त करण्यासाठी निदर्शने आयोजित करण्यात आली.
या निदर्शनास रत्नागिरी शहरातील सर्व बँकांमधील व नजीकच्या सर्व शाखांमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याचे नेतृत्व महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे जॉईंट सेक्रेटरी कॉ. विनोद कदम, बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटनेचे कॉ. किरण खोपडे, कॉ. रोहित सुर्वे, बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या कर्मचारी संघटनेचे कॉ. भागेश खरे, बँक ऑफ इंडिया बँकेच्या संघटनेचे कॉ. मनोज लिंगायत यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 24-02-2025














