दापोली : दापोली तालुक्यात उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. दापोलीत शनिवारी ३७.८ अंश तापमान नोंदवले गेले. या उकाड्याने नागरिक हैराण झाले असून, सकाळी साधारण १० वाजल्यानंतरच उन्हाचे चटके बसू लागल्याने नागरिक बाहेरच पडत नाहीत. त्यामुळे सुटीचा वार असूनही बाजारात शुकशुकाट होता.
गेल्या १५ ते २० दिवसांपूर्वीपासून सकाळचे वातावरण थंड त्यानंतर ११ वाजल्यानंतर उष्ण आणि रात्री पुन्हा थंड वातावरण असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. १ फेब्रुवारी या दिवशी किमान तापमान ९.४, तर कमाल तापमान ३१.७ होते. तिथून वातावरणात चांगलाच फरक पडत गेला. दोन्हीही तापमानात वाढ होऊ लागली. १४ फेब्रुवारीला तर कमाल तापमान ३६.४, तर किमान तापमान ११.९ अंश सेल्सियस असे होते. त्यानंतर तापमानात बन्धकी वाच होऊ लागलो असून, सकाळी साधारण सकाळी १० वाजल्यानंतर उन्हाचे चटके लागू लागले आहेत. तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाली असून, ते ३७.८ अंशापर्यंत गेले आहे. त्यामुळे दुपारच्या वेजेस रस्त्यावा खूपच कमी वर्दळ असते.
दिवसभर होणाऱ्या उसापामुळे शीतपेयाच्या दुकानांत गर्दी होत असून, वालिंगड, सरबत तथा थंड पेयांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. जागोजागी कलिंगड विकीचे स्टॉल वाढले आहेत, महिलावर्गामध्ये स्कार्फ वापरण्याचे प्रमाण सुरु झाले आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कधी विद्यापीठाच्या हवामानशी विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुरुवारी (ता. २०) सकाळी ८ वाजल्यापासून ते शुक्रवारी (ता. २१) सकाळी ८ वाजेपर्यंत नोंदवले गेरोले कमाल तापमान ३७.८, तर किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस होते. गुरुवारी (ता. २०) कमाल तापमान ३४.८, किमान १३.२. २० तारखेला बामाल ३२.२. किमान १०.९ अंश, तर १९ तारखेला कमाल ३४५, किमान १२.६. १८ तारखेला कमाल ३५.२. किमान १२.५ सेल्सिअस इतके होते. आता थंडी कमी होउन उष्णतेत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हंगामानुसार उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे. बऱ्यापैकी तापमानात बदल घडून येत आहेत. सध्या तरी दिवसा जरी वातावरण उष्ण असले तरी रात्रीच्या वेळेचे तापमान हे वेगळे असते. सध्यातरी हे तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. यामध्ये जर वाढ झालीच तर साधारण ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंतच वाढू शकते. – डॉ. विजय मोरे, प्रमुख अधिकारी, हवामानशास विभाग, कोकण कृषी विद्यापीठ
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 24/Feb/2025














