रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 3 वर उभ्या असलेल्या रत्नागिरी-दिवा पॅसेंजर गाडीत तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े. ही घटना शनिवारी सकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास घडल़ी. या प्रकाराने हादरून गेलेल् पीडित तरुणीने या प्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केल़ी. पोलिसांनी तातडीने पथक तयार करून संशयित आरोपीला चिपळूणमधून ताब्यात घेतल़े.
निम्रान इन्तिखाब अल्जी (30, ऱा. रत्नागिरी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आह़े. सुरक्षा व्यवस्था असलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकात घडलेल्या या प्रकाराने महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह़े.
पिडीत तरुणी ही सकाळी 5.30 च्या रत्नागिरी-दिवा पॅसेंजर गाडीने खेड येथे महाविद्यालयात लेक्चरसाठी जात होत़ी. सकाळी गाडीला जास्त प्रवासी नसल्याने ती बसलेल्या गाडीचा डबा रिकामाच होत़ा. सकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी हा दबक्या पावलांनी तरुणीच्या पाठीमागील बाजूने आल़ा. यावेळी बेसावध असलेल्या तरुणीची मान पकडून तिच्याशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न करीत विनयभंग केला.
अचानक घडलेल्या प्रकाराने तरुणी पुरती गडबडून गेली होती. संशयित आरोपी याच्या ताब्यातून सुटण्यासाठी तरुणीने प्रतिकार करण्यास सुरुवात केल़ी. अखेर आपली पकड सुटत असल्याचे लक्षात येताच आरोपीने पीडित तरुणीला जोरात ढकलून दिल़े तसेच पॅसेंजर गाडीतून जोराने धाव घेत त्याठिकाणाहून पसार झाल़ा. या घडल्या प्रकाराने पीडित तरुणी पुरती हादरुन गेल़ी. तिने आपल्या नातेवाईकांना फोन करुन याची माहिती दिल़ी.
नातेवाईकांनी तरुणीला धीर देत घाबरुन जावू नको, असा सल्ला दिल़ा तसेच घटनास्थळी धाव घेतल़ी घडल्या प्रकाराबाबत तरुणीने रेल्वे पोलिसांसह रत्नागिरी शहर पोलिसांना माहिती दिली. रत्नागिरी शहर पोलिसांत अनोळखी इसमाविरुद्ध तक्रार दाखल करुन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली.
आरोपीला पकडण्यासाठी शोध मोहिम हाती राबवली. यावेळी रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासल़े त्यानुसार आरोपीचा माग काढत पोलिसांनी संशयित आरोपी निम्रान याला चिपळूणमधून ताब्यात घेतल़े या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक शीतल पाटील करत आहेत़
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 24-02-2025














