खेड : तालुक्यातील खेड आंबवली मार्गावर भरणे नाक्या नजीकच्या साई रिसॉर्ट समोर पादचारी व भरणे पुलाखाली एका अॅक्टिवा दुचाकीला धडक देऊन एक अल्टो मोटार घटनास्थळावरून निघून गेली. शनिवारी दि. २२ रोजी सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली. या अपघातात खेड आंबवली मार्गावर काळकाई बस थांब्यावर पुरे बुद्रुक येथे जाण्यासाठी चाललेल्या बबन लक्ष्मण मुकणे (३५, रा. पुरे बुद्रुक) यांना मोटारीने धडक दिली. भरणे नाका पूल खाली उभी असणारी श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नाणिजच्या मोफत रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना प्रथम उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत सायंकाळी उशिरा पर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 24/Feb/2025














