श्रृंगारतळी : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावडेवाडी येथील असंख्य शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात सालाबादप्रमाणे याहीवर्षी बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री उत्सव आणि श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या महाशिवरात्री उत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी ७ वा. अभिषेक, दुपारी ११ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी ३ वा. महिलांचा हळदीकुंकू, संध्या. ४ वा. इतर स्पर्धा, संध्या ६ वा. महाआरती, संध्या ७ ते ९ शिवभंडारा, रात्री ९ वा. मान्यवर व विद्यार्थी सत्कार समारंभ, रात्री १० वा. नव विकास नमन मंडळ अबिटगाव यांचे कोकणचे लोकप्रिय नमन ‘हात भिजले रक्ताने’ असे कार्यक्रम पार पडणार आहेत. तरी भाविकांनी दर्शनाचा आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवदेव बेलवृक्ष उत्कर्ष मंडळ व महिला मंडळ पाटपन्हाळे गावडेवाडी तर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 24/Feb/2025














