रत्नागिरी : सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चारजणांवर गुन्हा

रत्नागिरी : शहरातील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या ४ जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार २३ फेब्रुवारी रोजी ८ ते ८.४५ वा. कालावधीत करण्यात आली.

धनंजय जयदेव शिंदे (३२, रा. विनम्रनगर नाचणे, रत्नागिरी), ओंकार दिलीप गावडे (२६), पंकज विठ्ठल गावडे (२८, दोन्ही रा. चाफे गावडेवाडी, रत्नागिरी) आणि अक्षय शिरीष पाटील (३०, रा. हिंदू कॉलनी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. हे चारही जण सार्वजनिक ठिकाणी आपल्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना दारु पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूरुबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 25/Feb/2025