Weather Update : कोकणात पावसाचा इशारा

पुणे : Weather Update : कोकणात गत दोन दिवसांपासून अत्यंत उष्ण आणि दमट वातावरण आहे. त्यातच सोमवार आणि मंगळवारी या भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उर्वरित राज्यात मात्र कोरडे वातावरण राहणार आहे.

राज्यातील बुहतांश भागात रविवारी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला होता. मात्र, कुठेही पावसाची नोंद झालेली नाही. आगामी 48 तास (सोमवार, मंगळवार) कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

रविवारचे कमाल तापमान

सोलापूर 37.9, अकोला 37.1, सांगली 36.8, रत्नागिरी 35.6, पुणे 35.7, अहिल्यानगर 35.2, छत्रपती संभाजीनगर 35, ब्रह्मपुरी 36, कोल्हापूर 35.1, महाबळेश्वर 30.9, मालेगाव 34.6, नाशिक 34.5, सातारा 35.7, मुंबई 35, धाराशिव 35.4, बीड 35.5, बुलडाणा 33.4, चंद्रपूर 36, गोंदिया 32.6, नागपूर 34.6, वाशिम 35.2, वर्धा 35.2, यवतमाळ 36.4.

Amey jwelrs

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 25-02-2025