मंडणगड : बाणकोट येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथील चाळीत प्रौढाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री ९ ते रविवार २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. कालावधीत घडली आहे. सोमनाथ मोतीराम कुंचाळे (५० मूळ रा. पिंपरी पाडा, मुंबई ईस्ट सध्या रा. बाणकोट, मंडणगड) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. त्यांनी चाळीतील भाड्याच्या रूममध्ये असलेल्या लाकडी खुंटीला नायलॉन रस्सीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 25/Feb/2025

Happy journey marathi