चिपळूण नगर परिषदेच्या शिबिरात ६५ जणांचे रक्तदान

चिपळूण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषदेने शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ६५ जणांनी रक्तदान केले. नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. डेरवण रुग्णालयाच्या सहकायनि हे शिबिर झाले. यावेळी आ. शेखर निकम, उद्योजक प्रशांत यादव, माजी नगरसेवक प्रकाश काणे, मोहन मिरगल, शशिकांत मोदी, लियाकत शाह, मनोज शिंदे, सचिन कदम, बाळा कदम, परिमल भोसले, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, मालमत्ता विभागप्रमुख सागर शेडगे, नगर अभियंता दीपक निंबाळकर, महेश जाधव, सुजित जाधव, वैभव निवाते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 25/Feb/2025