रत्नागिरी : दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी इचलकरंजी, कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत महेश मिलके स्विमिंग ग्रुप चे एकूण 18 खेळाडू सहभागी झाले होते.
सदर स्पर्धेमध्ये
1) करण मिलके(ओपन गट )( 1 गोल्ड, 2 सिल्वर, 3ब्रॉन्झ )
2) तनया मिलके ( ओपन गट )(4 गोल्ड, 1सिल्वर व वैयक्तिक चॅम्पियनशिप )
3) निधी भिडे (12 वर्षाखालील ) ( 2 गोल्ड, 1 सिल्वर, 1 ब्रॉन्झ )
4 ) आयुष काळे (16 वर्षाखालील )(1 ब्रॉन्झ )
5) चैतन्य कदम (16 वर्षाखालील )(1ब्रॉन्झ )
6) कस्तुरी दळवी ( 19 वर्षाखालील )(1सिल्वर, 1ब्रॉन्झ )
7)संस्कृती जाधव (ओपन गट )(1ब्रॉन्झ )
नंबर पटकावले तसेच सदर स्पर्धेमध्ये श्लोक राणे, ओम माळी, रुद्र सरफरे, अर्णव पिलणकर, श्रेयांश पावसकर, रिद्धेश हरचेकर, स्वरा खांबे, वरद भिसे, अर्चित कंगुटकर, आयुष कटाळे, शौर्य राऊत, अधीश जाधव या खेळाडूंनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली.
सदर स्पर्धकांना राष्ट्रीय जलतरणपटू व राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. महेश मिलके सर यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय, विभागीय स्पर्धेत श्री. अजित पिलणकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धे करिता निवड झाली व राज्यस्तरीय महसूल स्पर्धेत सांघिक द्वितीय व 100 मी. बॅकस्ट्रोक ला तृतीय क्रमांक पटकावला.महसूल विभागातील श्री. अजित पिलणकर यांनी यश संपादन केले व ते महेश मिलके स्विमिंग ग्रुप चे सदस्य आहेत व गेली 2 वर्षे महेश मिलके सरांकडे प्रशिक्षण घेत आहेत त्याबद्दल त्यांनी प्रशिक्षक महेश मिलके सर यांचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 25-02-2025














