चिपळूण : सुरक्षेच्या उपाययोजनेनंतरच कोकण रेल्वे झाली मार्गस्थ

चिपळूण : कोकण रेल्वेमार्गावरील चिपळूण गेट नं. २० येथे काही तांत्रिक कारणास्तव रेल्वेफाटक पूर्णतः बंद झालेले नव्हते. त्यामुळे गेटमनने पर्यायी व्यवस्था असलेल्या बुमच्या साह्याने गेट बंद करून २ रेल्वेगाड्या मार्गस्थ केल्या. मुख्य गेट लॉक झाले नसले तरीही पर्यायी सुरक्षेचा उपाययोजना करूनच रेल्वे मार्गस्थ केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना कोणताही धोका निर्माण झालेला नाही.

याबाबत रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार २२ फेब्रुवारीला चिपळूण गेट नं. २० येथील गेटमनला वंदेभारत रेल्वेगाडी पास होणार असल्याची सूचना मिळताच त्यांनी गेट बंद करण्याची प्रक्रिया केली; मात्र तांत्रिक अडवणीअभावी खाली आलेले गेट पूर्णतः लॉक झाले नाही. अशा स्थितीत गेट लॉक न झाल्यास गेटपासून २०० मीटरवर असलेले सिग्नल कार्यान्वित होतात. याच पद्धतीने सिग्नल कार्यान्वित झाले आणि गेटपासून सुरक्षित अंतराच्या आधीच वंदेभारत गाडी थांबली. या वेळी गेट बंद होते. गेटमनने पायलाटिंग करत संथगतीने वंदेभारत गाडी येथून पास केली. यानंतर येथून प्रयागराज एक्स्प्रेस आणि मालगाड़ी मार्गस्थ झाली. गेटमनने येथे पर्यायी व्यवस्था म्हणून असलेल्या बूमच्या साहाय्याने गेट बंद करत दोन्ही गाड्या मार्गस्थ केल्या. २२ ला सायंकाळी ६.४५ ते ७.०४ दरम्यान या गेटमधून तीन गाड्या सुरक्षितपणे मार्गस्थ करण्यात आल्या. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौक्त मुकादम यांनी रेल्वेगेट उघडे असतानाच रेल्वेगाड्या धावल्याचे म्हटले होते; मात्र रेल्वेगेट उघडे असले तरी पर्यायी गेट लावून सुरक्षितता बाळगल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

उडाणपुलासाठी प्रयत्न सुरू
कळंबस्ते रेल्वेफाटका उड्डाणपूल उभारण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून केली जात आहे. खेड आणि चिपळूण तालुक्यातील ३०हुन अधिक गावांना जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. येथून नियमित वाहतू‌क सुरू असते. या कामाचे सुमारे ३० कोटीहून अधिक खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. या कामी रेल्वे प्रशासनाकडून ५० टक्के खर्च केला जाणार आहे: मात्र राज्य सरकारकडून उर्वरित निधीची तरतूद करण्याचे काम सुरू आहे. कळंबस्ते फाटक येथे उड्डाणपूल होण्यासाठी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 25/Feb/2025

Shanti2