रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांची पदोन्नती झाली असून त्यांची धाराशिव येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी मात्र याठिकाणी कोणाची नियुक्ती झाली हे समजू शकले नाही.
गेले दोन वर्ष कीर्तीकिरण पुजार यांनी जिल्हा परिषदचा कारभार यशस्वीपणे सांभाळला. त्यांच्या कालावधीत अनेक आदर्श असे उपक्रम राबवले गेले. यामध्ये महिला बचतगटांसाठी हाऊसबोट त्याचबरोबर सौरऊर्जा या प्रकल्पांचा समावेश आहे. एक आदर्श मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. स्थानिक स्वराज्य संस्थेवर पदाधिकारी नसतानासुद्धा त्यांनी ग्रामीण भागातील कारभार यशस्वी सांभाळला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 26/Feb/2025














