राजापूर : धूतपापेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव सुरू

राजापूर : राजापुरातील प्रसिद्ध धूतपापेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवकाळात दररोज सकाळी ६ वा. पारंपरिक वाद्य, ६.३० वा. नित्यपूजा, श्रीवर रूद्राभिषेक, दुपारी २ ते ४ शयनकाल, सायं. ७.३० वा. गायन, रात्री ८ वा. कीर्तन, १० वा. भोवत्या, ११.३० वा. आरती असे कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी (ता. २६) महाशिवरात्री यात्रा होणार आहे. या दिवशी पहाटे ३ वा. नित्यपूजा, श्रीवर रूद्राभिषेक, सकाळी ९ वा. गुजराळी येथील शामला कुलकर्णी यांचे भजन, १० वा. भगिनी मंडळ महिला ग्रुप यांचे भजन, ११.३० वा. समर्थ भजनी मंडळाचे भजन, दुपारी १२.३० वा. कीर्तन, १.३० वा. शिवस्वरांजली भक्तीभाव गीतांचा कार्यक्रम, सायं. ४ वा. गजानन पवार यांचे भजन, ५ वा. गिरीश विचारे यांचे गायन, ७ वा. स्थानिक भजनांचा कार्यक्रम, (ता. २७) पहाटे श्रींची महापूजा, महानैवेद्य, ५ वा. भोवत्या होतील. शुक्रवारी (ता. २८) आरती झाल्यानंतर नमन, १ मार्चला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 26/Feb/2025

Shanti 4