चिपळूण : श्री क्षेत्र गांधारेश्वर मंदिरात आज महाशिवरात्री

चिपळूण : चिपळूण शहराचे ग्रामदैवत श्री जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट अंतर्गत श्री क्षेत्र गांधारेश्वर शिव मंदिरात बुधवार, दि. २६ फेब्रुवारी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भक्तजनांसाठी अभिषेक व दर्शनासाठी खुले राहील.

यानिमित्त श्री क्षेत्र गांधारेश्वर मंदिरात पहाटे ६ वा. अभिषेक, सकाळी १० ते १२ श्री अनिरुद्ध उपासना केंद्र चिपळूण यांची महाशिवरात्र विशेष उपासना, सायंकाळी ७ वाजता वारकरी सांप्रदाय शंकरवाडी यांचा हरिपाठ आणि दिवसभर श्रींचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 26/Feb/2025