खेड : शैक्षणिक क्षेत्रातील ‘एआय’वर कौस्तुभ बुटाला यांचे मार्गदर्शन

खेड : सहजीवन शिक्षण संस्था आणि रेव्हमॅक्स सिक्युरिटी सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी संयुक्तपणे शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि अंतर्गत लेखापरीक्षणाचे महत्त्व या विषयावर कार्यशाळा आयोजित केली.

संस्थेचे विश्वस्त व राज्यपाल सदस्य कौस्तुभ बुटाला यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल अतिशय मौल्यवान आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली. शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी ही माहिती खूप उपयुक्त ठरली. राजेश देडिया यांनी शैक्षणिक प्रक्रिया आणि अंतर्गत महत्त्वाच्या दिल्या. लेखापरीक्षणाबाबत सूचना देखील कार्यशाळेला संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार गुजराथी, सहजीवन संस्थेच्या सर्व आस्थापनांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्राचार्य डॉ. अनिता आवटी, आयटी विभागप्रमुख सचिन भोसले, प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांबळे, रोहित भोळे, जेष्ठ शिक्षक गोविंद राठोड आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 26/Feb/2025

Shanti 4