पावस : शिक्षणाबरोबरच एखादा खेळ निवडावा आणि त्यात कौशल्य दाखवावे, अशी बाबांची इच्छा होती. त्यातून योगासन खेळाची निवड केली. त्या खेळात बाकी कोणत्याही गोष्टी विकत घ्याव्या लागत नाहीत फक्त तुम्ही मेहनत, कष्ट व सराव यावर लक्ष केंद्रित करावे लागते. त्यामुळे त्या खेळात प्रावीण्य मिळवता येते, असे योगासनमधील पहिला श्री शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झालेली रत्नागिरीतील पूर्वा किनारे हिने मुलाखतीवेळी सांगितले.
गोळपकट्ट्यावरील ६४ व्या कार्यक्रमात तो बोलत होती. तिची मुलाखत अविनाश काळे यांनी घेतली. मुलाखतोवेळी आपला प्रवास मांडताना ती म्हणाली, त्या काळात कोर्वेस चिपळूण संस्थेची मुले योगा स्पर्धेत चमकत होती. रत्नागिरीमध्ये प्रशिक्षण उपलब्ध नव्हते म्हणून दर शनिवार, रविवार बाबा मला घेऊन चिपळूण येथे जायचे. तिसरीत असताना जिल्हास्तरावर पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत अव्वल कामगिरी केली.
योगासन स्पर्धा म्हणजे काय हे सहावीत कळलं. रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयात नियुक्त झालेले योगप्रशिक्षक रविभूषण कुमठेकर यांनी योगा प्रशिक्षणाला वेगळा आयाम दिला. ते नियमित सराव घेत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला बॅकबेंडिंग, फ्रंट बेडिंग यांसह अन्य आसने मी करत होते. हॅन्डबॅलन्स या प्रकारासाठी खूप मेहनत करावी लागलो. सुरुवातीला व्यायाम, सर्व प्रकारची आसने, प्राणायाम, अनुलोम-विलोम, कपालभाती, मुद्रा, सूत्रनेती, जलनेती अशी सरावाची पद्धत होती. स्पर्धा असतील तेव्हा रोज चार तास आणि अन्पवेळी दोन तास सराव करते. त्या वेळी माझ्यावरोवर प्राप्ती, सानिका केळकर, अर्वती काळे, प्रीतीश दीक्षित, दुर्वांकुर चाळके, सृष्टी जाधव, महेश खणगावकर, राधिका दुर्गवळी, श्रुती फणसे, गौरी शिदि, युग जैन आदी योगासनात अव्वल होते. शालेय आणि फेडरेशन अशा दोन प्रकारच्या स्पर्धा होतात. शालेयमध्ये १९ वर्षांपर्यंत स्पर्धा खेळता येतात. दोन्ही प्रकारच्या अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी-उपविजयीचा किताब पटकावला आहे.
भारताच्या सलग तीन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धात योगामध्ये सुवर्णपदक मिळाले. देशांतर्गत होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. पुढे होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी माझी निवड झाली आहे, असे पूर्वाने सांगितले.
राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक
लवकरच एशियाड आणि ऑलिम्पिकमध्ये योगाचा समावेश होण्याची शक्यता आहे. पुढील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मेघालयमध्ये २०२७ला होणार असे जाहीर झाले आहे. त्या स्पर्धेतही चांगली कामगिरी करून सुवर्णपदक मिळवण्याची इच्छा आहे. योगा स्पर्धा वैयक्तिक, नहीदमिक, आर्टिस्टिक अशा तीन प्रकारांत होतात. या खेळाला फक्त मेहनत, सराव आणि चिकाटी आवश्यक आहे. आता बोगामध्ये राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या तर शिष्यवृत्तीही मिळते, असे पूर्वा हिने सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 26/Feb/2025














