दापोली : जालगाव येथे मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

दापोली : मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात संपन्न होतो. कवी कुसुमाग्रज यांची २७फेब्रुवारी ही जयंती. या निमित्ताने मराठी भाषा गौरव दिन हा संपूर्ण महाराष्ट्रभर संपन्न केला जातो.

दापोली तालुक्यातील जालगाव येथे महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत जालगाव समोरील महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक येथे उद्या २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मराठी भाषा गौरव दिनानिमित्त, ‘अभिजात मराठी भाषा म्हणजे काय’ या विषयाला अनुसरून चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक वक्त्या म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रेणूताई दांडेकर उपस्थित राहणार आहेत. त्या समवेतच दापोली तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कवी यांची देखील उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थी युवक आणि सर्व स्तरातील मराठी प्रेमी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समितीचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 26/Feb/2025

Shanti real estate 1