खेड : भरणेनाका येथील अपघात प्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा

खेड : तालुक्यातील भरणा नाका येथे शनिवार २२ रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास एका दुचाकीला धडक देऊन नंतर भरणे ते आंबवली मार्गावर साई रिसॉर्ट हॉटेल समोर पादचारी तरुणाला धडक देऊन अपघात केल्या प्रकरणी दुचाकीस्वार तरुणाविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात बबन लक्ष्मण मुकणे (वय ३५ रा. पुरे बुद्रुक ता. खेड जि. रत्नागिरी) हा पादचारी व राजेंद्र विष्णु भोसले (वय ६२) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या दुखापतीस व दुचाकी (एमएच ०८ एके ९४५५) च्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार राज सुनिल भोसले (रा. शिक्षक कॉलनी, समर्थनगर, भरणे, ता खेड) यांच्या विरोधात येथील पोलिस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 27/Feb/2025