चिपळूण : आजारपणाला कंटाळलेल्या ७४ वर्षीय वयोवृद्धाने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना नायशी नारळीवाडी येथे सोमवारी घडली. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
सुभाष लक्ष्मण घाग (७४, रा. नायशी नारळीवाडी) असे आत्महत्या केलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचे नाव आहे. सुभाष घाग यांना रक्तदाब आणि फुप्फुसाचा आजार होता. या आजारपणाला कंटाळून तसेच वयोवृद्ध असल्याने त्यांनी नायशी नारळीवाडी येथील राहत्या घरी स्वतःला जाळून घेतले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास सावर्डे पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 27/Feb/2025














