राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत देवरूखचा अर्णव कुलकर्णी विजेता

देवरूख : पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी, पुणे यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा इलेव्हेट-२५ मधील कॅरम स्पर्धेत देवरुखचा अर्णव विनायक कुलकर्णी हा एकेरी प्रकारात विजेता ठरला. त्याला चषकासह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन आयोजकांकडून गौरविण्यात आले.

अर्णव कुलकर्णी देवरुख येथील वरची आळीचा मूळ रहिवासी आहे. तो विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधील बॅचलर इन इंजिनिअरिंगच्या (बी. ई.) द्वितीय वर्षाचे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचे शिक्षण घेत आहे.

त्याचे प्राथमिक शिक्षण आदर्श छत्रपती शिवाजी विद्यामंदिर पू. प्रा. शाळा क्र. ४, तर माध्यमिक एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, देवरुख आणि एच.एस.सी.पर्यंतचे शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून झाले आहे. अर्णवला कॅरमचे प्राथमिक धडे वडील विनायक कुलकर्णी यांनी दिले तर रवींद्र कुलकर्णी, दामोदर घाणेकर, निनाद देसाई, योगेश साठे, पंकज खरात, योगेश आणि विजय कोंडविलकर यांचे नियमित सराव व मार्गदर्शन मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 27/Feb/2025