खेड : तालुक्यातील धामणंद गावठाण भापदीवाडी येथे दि. २३ रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास एका महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी राहुल राजाराम खैर (वय ३२) हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि त्याने घरातील सदस्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पीडित महिलेने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने रागाच्या भरात घरातील लाकडी दांडक्याने तिला मारहाण केली. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 27/Feb/2025














